दिल्लीत ट्रॅफिक पोलिसाने महिलेला मारली वीट

By Admin | Updated: May 11, 2015 19:22 IST2015-05-11T16:29:10+5:302015-05-11T19:22:43+5:30

दिल्लीत ट्रॅफिक पोलिसाने एका महिलेला वीट फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Traffic police in Delhi caught brick | दिल्लीत ट्रॅफिक पोलिसाने महिलेला मारली वीट

दिल्लीत ट्रॅफिक पोलिसाने महिलेला मारली वीट

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - दिल्लीतील गोल्फ लिंक परिसरात ट्रॅफिक पोलिसाने एका महिलेला वीट फेकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश चंद्र असे त्या पोलिसाचे नाव असून तो एका महिलेला मारत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर फिरत असल्याने त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान याप्रकरणी सतीश चंद्र यांना निलंबित करण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, रमनजीत कौर या आपल्या तीन मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना सिग्नल तोडल्याच्या कारणावरून सतीश चंद्र यांनी त्यांना मथुरा रोड येथे रोखले. त्यानंतर चंद्र यांनी आपल्याकडे लाच मागितील असा आरोप कौर यांनी केला आहे. मात्र आपण लाच देण्यास नकार दिल्यानंतर चंद्र यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचेही कौर यांनी सांगितले. चंद्र एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपल्यावर वीट फेकून मारहाणही केली असेही त्यांनी सांगितले. चंद्र वीट फेकून मारत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून त्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. दरम्यान पीडत कौर यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

Web Title: Traffic police in Delhi caught brick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.