अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
अ ैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडलानागपूर : अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर अरोली पोलिसांनी पकडला. यात पोलिसांनी दोन ब्रास रेतीसाठ्यासह दोन लाख दोन हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (गुजर) शिवारात रविवारी सायंकाळी ६.६० वाजतादरम्यान करण्यात आली. खंडाळा (गुजर) शिवारात आरोपी चालक विकास कोठीराम समरीत (४०, रा. अरोली, ता. मौदा) हा एमएच-४०/एल-३२४५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना आढळले. सदर ट्रॅक्टरची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात दोन हजार रुपयांचा दोन ब्रास रेतीसाठा आढळून आला. जप्त टॅ्रक्टरसह दोन लाख दोन हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अरोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदवून पसार आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सूर्यभान जळते करीत आहे. (प्रतिनिधी)