बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:08+5:302015-02-10T00:56:08+5:30
ट्रकच्या चेसीस नंबरची खोडतोड : आरोपी चालकावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक
ट रकच्या चेसीस नंबरची खोडतोड : आरोपी चालकावर गुन्हा दाखलनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) पकडले. सुवर्णसिंग अजितसिंग (रा. बेलतोडा, गुवाहाटी) आणि पिंटूसिंग बलकनसिंग विर्क (रा. शेंडेनगर, टेकानाका) अशी आरोपींची नावे आहेत. २२ जानेवारीला वर्धा मार्गावर एनएल ०८/ ए ५८६५ क्रमांकाचा ट्रक आरटीओंनी थांबविला. ट्रकची आणि कागदपत्रांची पाहणी केली असता आरोपींनी चेसीस नंबरची खोडतोड केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिवहन अधिकारी जे. जे. भोरे (वय ३२) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली सुवर्णसिंग आणि पिंटीसिंग या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ---बॉक्स--आरटीओचे दुर्लक्षएकाच क्रमांकाची अनेक वाहने आणि एकाच वाहनाच्या कागदपत्रांचा अनेक वाहनांसाठी उपयोग करण्याचे गैरप्रकार ठिकठिकाणी सुरू आहे. पोलीस आणि काही परिवहन अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून वाहनमालक हे गैरप्रकार करतात. ओव्हरलोडिंगचा प्रकार तर रस्त्यारस्त्यावर बघायला मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातही होतात. आरटीओचे या गैरप्रकाराकडे कसे लक्ष जात नाही, ते कळायला मार्ग नाही.-----