...या गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा
By Admin | Updated: May 9, 2016 13:23 IST2016-05-09T13:23:06+5:302016-05-09T13:23:06+5:30
संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाह

...या गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा
>ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. 09 - आज संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाही.
झाशी आणि ललितपूर यांच्यामध्ये स्थित असलेल्या तलबेहटमधील ग्रामस्थ मोर प्रल्हाद (1802-42) यांच्या कार्यकाळापासून सुरु असलेल्या या परंपरेचं अजूनही पालन करत आहेत. त्याकाळी अक्षय्य तृतीया साजरी करण्यासाठी पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांचं अपहरण करुन त्यांना तलबेहटमधील किल्ल्यात नेण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार करणारे राज्यकर्त्यांचीच लोक होती. या घटनेनंतर अक्षय्य तृतीया साजरी करणं बंद झालं.
घटनेनंतर ग्रामस्थांनी, लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा तर बंद झाली मात्र यानंतर महिलांना आदर देण्याची परंपरा सुरु झाली. महिलांचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाया पडण्याची परंपरा सुरु करण्यात आली. या नव्या परंपरेत जात, धर्म, उच्च, कनिष्ठ या गोष्टींना लांब ठेवण्यात आलं. जर एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या पाया पडत असेल तर तिची जात, धर्म कोणता आहे या गोष्टीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
तलबेहटमध्ये आता उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. ज्यामध्ये तलबेहट किल्ला झाकला जात आहे. मुख्य रस्त्यावरुन किल्ला दूर केला जात आहे.