शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 12:14 IST

Farmer protest, tractor Rally : अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्य तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला. 

दिल्लीमध्येप्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला. 

दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. 

आजचा दिवस देशासाठी खूप महत्वाचा आहे. एकीकडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. दिल्लीच्या सीमेवर सध्या 60000 हून अधिक ट्रॅक्टर उभे ठाकले आहेत. परंतू, सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केले आहे. 

दिल्लीला जाण्यासाठी केएमपी-केजीपीवर जवळपास 25 ते 30 किमीच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रवेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डर उघडली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला रवाना होणार आहेत. मात्र, काही ठिकाणी बॅरिकेड्स असल्याने ते हटवून काही शेतकरी पुढे जाऊ लागले आहेत. 

 नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर 62 किलोमीटर, तिक्री बॉर्डरवर 63 किलोमीटर आणि गाझीपूर बॉर्डरवर 46 किलोमीटर ट्रॅक्टर परेड पोलिसांच्या बंदोबस्तात काढली जाणार आहे. यामध्ये एक ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणार नाही. असे केल्यास त्या ट्रॅक्टरला परेडमधून बाहेर काढले जाणार आहे, असे शेतकरी नेत्यांनी ठरविले आहे. ट्रॅक्टर परेडवेळी सामान्य लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक 100 मीटरवर व्हॉलिंटिअर तैनात करण्यात येणार आहेत. परेडच्या सुरुवातीला ज्येष्ठ शेतकरी आणि नेते असणार आहेत. त्यानंतर तरुण शेतकरी मोर्चा सांभाळणार आहेत. ही परेड रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. तसेच कोणीही वादग्रस्त घोषणा किंवा बॅनरबाजी करणार नाही. तसेच हत्यारे किंवा दारू घेऊन कोणीही परेडमध्ये येणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपRepublic Dayप्रजासत्ताक दिनdelhiदिल्ली