ट्रॅक्टरची कारला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:25 IST
जळगाव : वेगात जाणार्या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बोरनार रोडवरील इकरा उर्दू हायस्कूलजवळ घडली. या अपघातात कारमधील एक जण ठार झाला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रॅक्टरची कारला धडक; एक ठार
जळगाव : वेगात जाणार्या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बोरनार रोडवरील इकरा उर्दू हायस्कूलजवळ घडली. या अपघातात कारमधील एक जण ठार झाला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दहिगाव संत (ता.पाचोरा) येथील देवानंद धनसिंग पाटील (वय ४७) हे कामानिमित्त जळगावला आले होते. काम आटोपून ते जळगावहून म्हसावदपर्यंत रेल्वेने गेले. म्हसावदपासून दहिगाव संतला जाण्यासाठी ते (एमएच ०८ आर ४२३७) क्रमांकाच्या कारने निघाले होते. या कारला बोरनार रस्त्यावर इकरा उर्दू हायस्कूलसमोर समोरून येणार्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने देवानंद पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे पुतणे सचिन राजेंद्र पाटील (रा.दहिगाव संत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.