बलात्कार पीडित महिलेचे मुख्य न्यायाधीशासमोर विषप्राशन
By Admin | Updated: September 22, 2014 18:47 IST2014-09-22T18:42:49+5:302014-09-22T18:47:05+5:30
सामूहिक बलात्कार झालेल्या एका पीडित महिलेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

बलात्कार पीडित महिलेचे मुख्य न्यायाधीशासमोर विषप्राशन
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - सामूहिक बलात्कार झालेल्या एका पीडित महिलेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पीडित महिला ही व्यवसायाने वकील आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना छत्तीसगडमधील बलात्कारी पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात आली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छत्तीसगड पोलीस आरोपीला पकडण्यात चालढकल करीत असल्याचा आरोप करीत या महिलेने मुख्य न्यायाधीश यांच्या चेंबरबाहेर विशप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेला तात्काळ राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहे.