शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:30 IST

छिंदवाडात मृत्यू झालेल्या लहान मुलांना दिल्या गेलेल्या इतर औषधांचे नमुनेही तपासण्यात आले असून त्यात अँटिबायोटिक्ससह इतर औषधांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय औषध नियामक ‘सीडीएससीओ’ने विषारी कफ सिरपप्रकरणी सहा राज्यांत कसून तपासणी सुरू केली असून त्यात महाराष्ट्रातील औषधी कंपन्यांचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांतही सीडीएससीओची पथके औषध कंपन्यांची तपासणी करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश व राजस्थानात चिमुकल्यांचे जीव घेणाऱ्या ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल (डीईजी) नामक रासायनिक पदार्थाचे तब्बल ४८.६ टक्के प्रमाण आढळले आहे.

दरम्यान, छिंदवाडात मृत्यू झालेल्या लहान मुलांना दिल्या गेलेल्या इतर औषधांचे नमुनेही तपासण्यात आले असून त्यात अँटिबायोटिक्ससह इतर औषधांचा समावेश आहे. मात्र, यात कोणतेही घातक घटक आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोल्ड्रिफ हा कफ सिरपच दोषपूर्ण असल्याचे दिसत आहे. ‘कोल्ड्रिफ’ सिरपमध्ये जो डीईजी घटक आढळला तो मूत्रपिंड निकामी करून जीवघेणा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचेच प्रमाण अधिक होते.

केंद्र सरकारकडून दखलया भयंकर घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली. सर्व औषध कंपन्यांनी ‘शेड्यूल एम’मधील नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अशी सूचना आरोग्य सचिवांनी केली. मुलांसाठी कफ सिरपचा वापर करताना अत्यंत काळजी घेण्याची सूचना सचिवांनी केली. 

कायद्यात ही आहे तरतूदलहान मुलांसाठी विषारी ठरलेला कफ सिरप लिहून दिल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉक्टरवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे सिद्ध झाले तर कायद्यामध्ये या प्रकरणी अनुक्रमे १ वर्ष, १० वर्षे आणि १० वर्ष ते आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Toxic chemical in cough syrup: CDSCO investigates six states, including Maharashtra.

Web Summary : CDSCO investigates cough syrup toxicity in six states, including Maharashtra. 'Coldrif' syrup contained fatal levels of diethylene glycol. The government is taking action, emphasizing strict adherence to drug manufacturing standards. Doctors prescribing toxic syrups face imprisonment if convicted.
टॅग्स :medicineऔषधं