टॉवर चौकात तरुणाला मारहाण

By Admin | Updated: April 4, 2016 00:40 IST2016-04-04T00:40:08+5:302016-04-04T00:40:08+5:30

जळगाव: टॉवर चौकात रिक्षात बसला असताना शाकीर शेख शकील उर्फ राजू (वय २० रा.गेंदालाल मील) या तरुणावर रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच जणांनी फायटरने मारहाण केली. पाचही जण तोंडाला रुमाल बांधून आले होते.राजू जखमी झाल्यानंतर ते लागलीच तेथून फरार झाले. दरम्यान, राजूला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tower hit the young man in the tower | टॉवर चौकात तरुणाला मारहाण

टॉवर चौकात तरुणाला मारहाण

गाव: टॉवर चौकात रिक्षात बसला असताना शाकीर शेख शकील उर्फ राजू (वय २० रा.गेंदालाल मील) या तरुणावर रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच जणांनी फायटरने मारहाण केली. पाचही जण तोंडाला रुमाल बांधून आले होते.राजू जखमी झाल्यानंतर ते लागलीच तेथून फरार झाले. दरम्यान, राजूला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजू हा रविवारी संध्याकाळी पाच वाजता टॉवर चौकात मित्र असलम शेख भिकन याच्या रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही ६९१३) बसलेला होता.असलम हा जोगळेकर रेस्टॉरंटमध्ये कचोरी घेण्यासाठी गेल्यावर तोंडाला रुमाल बांधून पाच तरुण आले व रिक्षात बसलेल्या राजूला मारहाण करायला लागले. सर्वांजवळ फायटर होते, व त्यातील एक जण प्रवीण कोळी (रा.जैनाबाद) असल्याचे राजूचे म्हणणे आहे.
दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर असलम याने रिक्षाकडे धाव घेत राजूला सावरुन त्या तरुणांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. हे सर्व जण दुचाकीने आले होते व लांब अंतरावर त्यांनी गाड्या लावल्या होत्या. असलम याने राजू याला तशाच अवस्थेत घरी नेले व तेथून कुटूंबातील सदस्यांनी खासगी दवाखान्यात नेले. तेथून शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलिसांनी त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालय व शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमला होता. यातील जखमी राजू हा यात्रोत्सवात झुला लावण्याचे काम करतो. शनिवारीच तो पिंपळकोठा येथे यात्रेला गेला होता.
फोटो....

Web Title: Tower hit the young man in the tower