अनेकांचा बळी घेणारा मामा-भाच्याचा डोह ठरताहे पर्यटकांचा कर्दनकाळ

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.

Tourists' peak of captives of many parents | अनेकांचा बळी घेणारा मामा-भाच्याचा डोह ठरताहे पर्यटकांचा कर्दनकाळ

अनेकांचा बळी घेणारा मामा-भाच्याचा डोह ठरताहे पर्यटकांचा कर्दनकाळ

वरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.
अकोला, बुलडाणा व अमरावती सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर असून, त्याची स्थापना शेकडो वर्षांपूर्वीची असून, याच मंदिराच्या पायथ्याशी मामा-भाच्याचा डोह आहे. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी येत असतात. विद्यार्थी आंघोळीसाठी या पाण्यामध्ये उतरतात व पोहणे नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू होतो. मागील १० ते १५ वर्षांपासून या मामा-भाच्याच्या डोहामध्ये अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यामध्ये युवक व शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या डोहामध्ये पाण्याची पातळी कळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आंघोळीला गेले असता काही समजण्याआधीच त्यामध्ये बुडतात.
शनिवार, रविवार तसेच होळी पौर्णिमा या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात वारी भैरवगड येथे हनुमान दर्शन तथा वान धरण पाहण्यासाठी येतात व या डोहाच्या खोलीची व कपारींची पुसटशीही कल्पना नसताना ते पोहण्यास त्यात उतरतात. यापूर्वी येथे मृत्यू झालेल्यांच्या नावाची यादी या ठिकाणी लावण्यात आली होती; परंतु तो फलकसुद्धा आता या ठिकाणी नाही. या डोहामुळे होणारे पर्यटकांचे मृत्यू टाळण्यासाठी डोहाच्या चहूबाजूला तारेचे कम्पाउंड करणे गरजेचे असून, पर्यटकांना या डोहाच्या धोक्याबाबत जागरुक करण्यासाठी तेथे फलक लावणेही आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या ठिकाणी कम्पाउंड करून पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी फलक लावल्यास ते समाज हिताचे ठरू शकेल. (प्रतिनिधी)
फोटो : ०६एकेटीपी०३ व ०४.जेपीजी
कॅप्शन : वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह आणि काठावरील आसरा मंदिर.
........................

Web Title: Tourists' peak of captives of many parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.