शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पर्यटक काश्मीरच्या कुशीत, लडाख अजूनही उपेक्षित; ‘चलो कश्मीर’ मोहिमेबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:15 IST

पहलगाममधील नरसंहार आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पर्यटकांनी काश्मीरपासून काही काळ पाठ फिरवली होती.

सुरेश एस. डुग्गर

श्रीनगर : पहलगाममधील नरसंहार आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पर्यटकांनी काश्मीरपासून काही काळ पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पर्यटक काश्मीरकडे वळताना दिसत आहेत. याउलट लडाखमधील पर्यटन क्षेत्र अजूनही पूर्वीच्या पर्यटकवर्गाची प्रतीक्षा करत आहे. स्थानिक लडाखवासीयांना ‘चलो कश्मीर’ मोहिमेबाबत नाराजी आहे, कारण त्यात लडाखचा उल्लेखच नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लेहमधील पर्यटकांच्या संख्येत संमिश्र कल दिसून आला आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये पर्यटकांची संख्या एप्रिल २०२४ मध्ये १४,२३५ वरून २५,६८६ पर्यंत वाढली. ही ८० टक्के वाढ आहे. तथापि, मे महिन्यात ही संख्या जवळजवळ तशीच राहिली, गेल्या वर्षी २९,४९७ वरून यावर्षी किरकोळ घट होऊन २९,३५३ झाली.

व्यवस्थापनात सुधारणा आवश्यक

सध्या लडाखमध्ये प्रामुख्याने देशी पर्यटक दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा दूतावासाच्या सूचनांमुळे त्यांच्या योजना रद्द केल्या आहेत. पर्यटन क्षेत्राशी संबंधित त्सेरिंग दादुल यांच्या मते, सरकारने प्रचार आणि योजना व्यवस्थापनात सुधारणा करणे आवश्यक आहे.

पर्यटक स्वतःची वाहने घेऊन आल्याने स्थानिक वाहतूकदारांना फारसा लाभ होत नाही. तरीही, गेल्या दोन महिन्यांपेक्षा आता परिस्थिती चांगली आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. लडाखमध्ये परिस्थिती शांत असून, सुरक्षा व्यवस्था चोख  आहे, हे येथे आलेल्या पर्यटकांना लक्षात येते. त्यामुळे पुढील काळात पर्यटनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

जूनमध्ये मोठी घट

जूनमध्ये सर्वांत लक्षणीय घट दिसून आली. २०२४ मध्ये १,५३,७११ पर्यटकांनी भेट दिली होती. २०२५ मध्ये ही संख्या फक्त ६१,९२७ वर आली. ही आकडेवारी ६० टक्क्यांची घट दर्शवते. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ३७६,३८६ पर्यटकांनी लडाखला भेट दिली, तर जानेवारी ते २५ जून २०२५ दरम्यान १२७,४३७ पर्यटकांनी भेट दिली.