शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Employment: पर्यटनामुळे ८ कोटी लोकांना रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:33 IST

भारतात पर्यटन उद्योगाचा झपाट्याने होतोय विकास; परकीय चलनातून मिळाले २,७७,८४२ कोटी रुपये; पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम; अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: भारतात प्रचंड वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत असून, याचा फायदा पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या पर्यटन उद्योगामुळे २०३० पर्यंत या क्षेत्रातून साडेचार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन मिळू शकते आणि देशाच्या जीडीपीत या क्षेत्राचा वाटा सात टक्क्यांहून अधिक असेल, असे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातून परकीय चलनात मिळकत २,३१,९२७ कोटी रुपये इतकी होती, जी २०२४ मध्ये वाढून २,७७,८४२ कोटी रुपये झाली आहे. २०२४ मध्ये पर्यटनातून परकीय चलन २,७७,८४२ कोटी रुपये मिळाले. यात ८ ते १० टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा आहे. पर्यटनातील वाढ कायम राहिल्यास परकीय चलन मिळकत ४,५०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. ८ कोटी लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. हे प्रमाण एकूण रोजगाराच्या १२% आहे. १० कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना २०४७ पर्यंत आकर्षित करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे.

पर्यटनामुळे कोणते रोजगार मिळतात?थेट रोजगारांमध्ये हॉटेल्स, विमान सेवा कंपन्या, प्रवासविषयक संस्था व टूर ऑपरेटर यांचा समावेश. अप्रत्यक्ष रोजगारामध्ये बांधकाम, अन्न प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे. देशांतर्गत पर्यटनही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत या क्षेत्राचा वाटा १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हे क्षेत्र अधिक ग्राहककेंद्रित होत आहे. वेलनेस टुरिझम, ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, हेरिटेज सर्किट आणि लक्झरी एक्सपीरियन्स यासारख्या नवीन प्रवासाच्या ट्रेंडमुळे ट्रॅव्हल बिझनेससाठी संधी निर्माण होत आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनEmployeeकर्मचारीjobनोकरी