शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जय हो! देशात एका दिवसात १,९१,१८१ लोकांना दिली लस; एकही 'बॅड न्यूज' नाही

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 20:44 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या लसीकरणाला आजपासून झाला प्रारंभएका दिवसात देशात १,९१,१८१ लोकांना देण्यात आली लसलस टोचल्यानंतर कुणालाही पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही

नवी दिल्लीज्या दिवसाची संपूर्ण देश वाट पाहत होता तो दिवस आज आला. संपूर्ण देशभरात आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी एकूण १ लाख ९१ हजार १८१ लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्यांपैकी एकावरही लस टोचल्यानंतर साइडइफेक्ट किंवा इतर कोणत्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे भारतासाठी हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. 

लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम, कोरोना योध्दांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त आज देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांना अर्थात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी लोकांना लस  देण्याची योजना केंद्राने आखली आहे. कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे. 

आरोग्य मंत्र्यांनीही व्यक्त केला आनंदकोरोनावरील लस या महामारीच्या विरोधात संजीवनी सारखं काम करेल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. "मी अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत. कोरोनावरील ही लस संजीवनी म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे", असं आरोग्यमंत्री म्हणाले.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी