लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

By देवेश फडके | Published: January 16, 2021 11:14 AM2021-01-16T11:14:35+5:302021-01-16T11:16:54+5:30

गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला.

prime minister modi launches world largest corona vaccination drive programme | लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

Next
ठळक मुद्देदेशव्यापी कोरोना लसीकरणाचा शुभारंभपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशवासीयांशी संवाददुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा मानस

नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. 

भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू होत आहे. कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होतानी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्याला कोरोना लसीची सर्वांत जास्त गरज आहे, त्यालाच प्राधान्यक्रमाने कोरोना लस मिळणार आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले की, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस  घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने कोरोनाविरोधाची प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी लोकांना कोरोना लस

कोरोनावरील लस केव्हा येणार, असा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनाच मी हे सांगू इच्छितो की, लस आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या ३० कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे

इतिहासातील सर्वांत मोठे लसीकरण अभियान आहे. जगात १०० देश असे आहेत, ज्यांची एकूण लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. मात्र, भारत पहिल्या टप्प्यातच तीन कोटी लोकांना लस देणार आहे. लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असे समजून हलगर्जीपणा करू नका. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. 

कोरोना लसीच्या अपप्रचाराला बळी पडू नका

कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका. आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबाबत असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी  गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. 

Web Title: prime minister modi launches world largest corona vaccination drive programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.