दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
द न अल्पवयीन मुलींवर अत्याचारशिक्षिकेमुळे घटना उघडकीस : तीन नराधमांना अटकअमरावती : दोन अल्पवयीन मुलींवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले़ पिडीत मुलींनी ही बाब शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा उजेडात व पोलिसांत तक्रार देण्यात आली़ गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन नराधमांना अटक केली. मंगळवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रामविजय नामदेव डफर(४५,) रुपेश मदन आलोकार(४६) व अभिचंद नथुराम गुर(६५) अशी या नराधमांची नावे आहेत. पीडित दोन्ही मुली आई-वडिलांसोबत राहतात. वडील रिक्षा चालवितात तर आई धुणीभांड्याचे काम करते. परिस्थिती हलाखीची आहे. गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्या शेजारीच राहणार्या तीन नराधमांनी त्या दोन बहिणींवर अत्याचार केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. एक वर्षापासून हे तिघेही हा घृणास्पद प्रकार करीत होते. मुलींनी हा अत्याचार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. शिक्षिकेच्या माध्यमातून हे प्रकरण दिशा ग्रुप या महिला अत्याचार पीडित पुनर्वसन संस्थेला कळविण्यात आले. त्या अनुषंगाने सोमवारी रात्री दिशा ग्रुपच्या पदाधिकार्यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला़(प्रतिनिधी)