सहा महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार
By Admin | Updated: May 6, 2014 01:07 IST2014-05-06T01:07:22+5:302014-05-06T01:07:22+5:30
सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार

सहा महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार
स ा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचारफोटो- ०५ सीपीपीएच ०८कॅप्शन- आरोपी सूरजब्रह्मपुरी : सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करणार्या सुरज सावंत कराणकर (२२) रा. उदापूर या नराधमास ब्रह्मपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली.तो पीडित चिमुकलीचा नातेवाईक असल्याचे समजते. व्यवसायाने मेटॅडोर चालक असलेला सूरज हा उदापूर येथे पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. रविवारी चिमुरडीची आई तिला घेऊन शेजारच्या घरी बसली होती. यावेळी चार वर्षाचा मुलगाही सोबत होता. दरम्यान सूरजने चिमुकलीला फिरवून आणण्याचा बहाणा करून तिला बाहेर नेले. यावेळी पिडित चिमुरडीचा चार वर्षांचा भाऊही सोबत होता. काही वेळानंतर सुरजने चिमुरडीला परत आणून दिले. त्यावेळी तिला रक्तस्त्राव होत असल्याचे आईच्या लक्षात आले. त्याबद्दल तिने सूरजला विचारणा केली असता, ती खाली पडल्याने जखमी झाल्याची थाप त्याने मारली. महिलेने तिला ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात आणले. त्यानंतर तेथून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, गावकर्यांनी आरोपी सूरजला चांगलाच चोप दिला. (प्रतिनिधी)