टॉपर घोटाळ्यातील विद्यार्थ्याला अटक

By Admin | Updated: August 4, 2016 04:08 IST2016-08-04T04:08:42+5:302016-08-04T04:08:42+5:30

बिहारमधील बहुचर्चित बनावट इंटर टॉपर घोटाळ्यातील सायन्सचा टॉपर राहुल कुमार याला वैशाली येथून अटक करण्यात आली

Topper arrested for scam | टॉपर घोटाळ्यातील विद्यार्थ्याला अटक

टॉपर घोटाळ्यातील विद्यार्थ्याला अटक

एस.पी. सिन्हा,

पाटणा- बिहारमधील बहुचर्चित बनावट इंटर टॉपर घोटाळ्यातील सायन्सचा टॉपर राहुल कुमार याला वैशाली येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मंगळवारी रात्री उशिरा चांदपुरा भागातून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा चांदपुरा भागात एका नातेवाईकाकडे लपला होता. तो मुजफ्फरपूर जिल्ह्यातील साहेबगंजचा रहिवासी आहे. एसआयटीचे पथक राहुलला घेऊन पाटणा येथे आले आहेत. विज्ञान शाखेतील अन्य एक टॉपर सौरभ श्रेष्ठ अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेसाठी एसआयटी अनेक ठिकाणी छापे मारत आहे. यापूर्वीच बिहार बोर्डाने इंटर सायन्समधील टॉपर सौरभ श्रेष्ठ आणि राहुल कुमार यांचा निकाल रद्द केलेला आहे. राहुल तिसऱ्या स्थानावर होता. बिहार बोर्डाने काही दिवसांपूर्वी १४ टॉपर विद्यार्थ्यांना बोलाविले होते. त्यातील १३ जण हजर झाले होते.

Web Title: Topper arrested for scam