शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:57 IST

Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.  सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद (Mehrazuddin Halwai) याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक असलेल्या मेहराजुद्दीन हलवाई याचा खात्मा करण्यात आला आहे, तो अनेक मोठ्या कटामध्ये सहभागी होता. त्यामुळेच हे खूप मोठं यश आलं. 

मंगळवारी रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या 32 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 92 बटालियनची एक संयुक्त टीम या भागातील मोहिमेत सहभागी झाली होती. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं होतं. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं. मेहराजुद्दीन याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायात थेट सहभाग होता.

परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचाच खात्मा करण्यासाछी सुरक्षा दलाच्या वतीने सातत्याने ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. 

पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन

कट्टर दहशतवाद्यांची बरीचशी माहिती सुरक्षा दलांकडे उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणाऱ्या हायब्रीड दहशतवाद्यांची फारशी नोंद सुरक्षा दलांकडे नाही.  त्यामुळे या दहशतवाद्यांचा सामना करण्याचं आव्हान आता सुरक्षा दलांसमोर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून श्रीनगरसह खोऱ्यांमधील सोप्या लक्ष्यांवरील हल्ले वाढले आहेत. बहुतांश घटनांमध्ये पिस्तुलधारी तरुणांचा हात असल्याचं उघड झालं आहे. सुरक्षा दलांच्या यादीत या दहशतवाद्यांची नावं नाहीत. हायब्रीड दहशतवादी पार्ट टाईम कारवाया करत असल्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी