प्रेमसंबंधातून वडिलांनी कापली मुलीची जीभ
By Admin | Updated: December 7, 2014 15:36 IST2014-12-07T15:32:27+5:302014-12-07T15:36:57+5:30
गावातील तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने पश्चिम बंगालमध्ये पित्याने स्वतःच्याच मुलीची जीभ कापल्याची संतप्त घटना समोर आली आहे.

प्रेमसंबंधातून वडिलांनी कापली मुलीची जीभ
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.७ - गावातील तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने पश्चिम बंगालमध्ये पित्याने स्वतःच्याच मुलीची जीभ कापल्याची संतप्त घटना समोर आली आहे. सध्या या मुलीवर डायमंड हार्बरमधील रुग्णालयात तिच्यावर उफचार सुरु आहेत.
२४ दक्षिण परगणा येथील अधरमाणिक गावात नववीत शिकणा-या अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीचे वडिल मन्सूर अली लष्कर यांचा विरोध होता. त्यांनी मुलीला प्रेमसंबंध तोडायलाही सांगितले. मात्र मुलगी वडिलांचे म्हणणे ऐकतच नव्हती. अखेरीस संतापलेल्या पित्याने गावातील दोघा जणांच्या मदतीने मुलीची जीभ कापली. यानंतर त्यांनी गळा दाबून मुलीची हत्येचा प्रयत्न केला. मुलगी बेशुद्ध झाल्यावर तिला गावातील शेतामध्ये फेकून दिले. सकाळी स्थानिकांनी मुलीला बेशुद्धावस्थेत पाहिले व तिला रुग्णालयात दाखल केले. लष्कर व त्याचे दोघे साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.