मध्य प्रदेशात ‘टॉमी’ कुत्र्याचे आधार कार्ड

By Admin | Updated: July 4, 2015 02:40 IST2015-07-04T02:40:03+5:302015-07-04T02:40:03+5:30

एकीकडे आधार कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना मध्य प्रदेशात आधार कार्ड नामांकन संस्थेत कार्यरत एका इसमाने

'Tommy' dog support card in Madhya Pradesh | मध्य प्रदेशात ‘टॉमी’ कुत्र्याचे आधार कार्ड

मध्य प्रदेशात ‘टॉमी’ कुत्र्याचे आधार कार्ड

भिंड (म.प्र.) : एकीकडे आधार कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना मध्य प्रदेशात आधार कार्ड नामांकन संस्थेत कार्यरत एका इसमाने चक्क आपल्या कुत्र्याचे आधार कार्ड बनविल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आझम खान नामक या इसमास अटक केली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावरील उमरी वस्तीत आधार कार्डच्या नामांकन संस्थेत सुपरवायझर पदावर कार्यरत आझम खान (वय ३५) याने त्याच्या कुत्र्याचे आधार कार्ड काढले होते. या आधार कार्डचा क्रमांक ५४८५ ५००० ८००० असा आहे. त्यावर कुत्र्याचा फोटोही चिकटविण्यात आला आहे. त्याचे नाव टॉमी सिंग, वडील शेरू सिंग, लिंग-पुरुष, जन्मतारीख २६.११.२००९ अशी माहिती त्यात नमूद आहे.
याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी खानला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Tommy' dog support card in Madhya Pradesh