टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:34 IST2018-09-25T15:34:10+5:302018-09-25T15:34:27+5:30
येवला तालुक्यात पावसाळा संपत आला तरी वरु णराजा बरसला नसल्याने आता बळीराजा हतबल झाला आहे. तालुक्यात एकमेव नगदी पीक म्हणून घेतले जाणारे कांदा हा सद्या मातीमोल भावाने विकला जात आहे.

टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात
अंदरसुल : टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
येवला तालुक्यात पावसाळा संपत आला तरी वरु णराजा बरसला नसल्याने आता बळीराजा हतबल झाला आहे. तालुक्यात एकमेव नगदी पीक म्हणून घेतले जाणारे कांदा हा सद्या मातीमोल भावाने विकला जात आहे. काही वेळेला थोडा भाव जास्त मिळाला म्हणजे सर्व आलबेल आहे असा प्रचार होत असतो. वास्तविक कांदा हा शेतकरी प्रसंगी कर्ज घेऊन महागडी रोपे व खते खरेदी करून सात ते आठ हजार रु पये एकरी मजुरी देऊन उत्पन्न घेतात. भावाची हमी नसते मजुरीइतके दाम मिळत नाही. पाऊस न आल्याने अंदरसुल व उत्तरपूर्व भागातील कमी पावसात लागवड केलेली पिके मका कापूस सोयाबीन मूग भुईमूग ही खरिपाची पिके आज वाया गेली असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. डाळिंब टमाटे मातीमोल भावाने विकले जात आहे. दमदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी नाही तालुक्यातील पूर्वेकडील नद्या कोरड्या आहेत उष्णतेची तीव्रता जास्त झाल्याने कालव्याच्या जुजबी पाण्याने ओल्या झालेल्या जमिनी खड्डे नाले कोरडी झाली आहेत.खरीप हातचा जात असून रब्बीच्या पिके कशी घेता येतील याची विवंचनेत बळीराजा संकटांना सामोरे जाऊ शकत नसल्याचे चित्र दिसत आहे .