शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाची किंमत, नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे : सुप्रीम काेर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:22 IST

दिल्ली-नोएडा फ्लाय वे प्रकरणात दावा फेटाळला

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वानुसार बांधण्यात आलेल्या रस्ते मार्गांवर कायमस्वरुपी टोल वसूल करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लाय वे -उत्तर प्रदेश व दिल्ली सरकारने मिळून बीओटी तत्त्वावर बांधलेल्या मार्गाबाबत दाखल याचिकेवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात टोल कंपनीची धावया प्रकरणात टोल वसुली करणाऱ्या कंपनीने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला दावा नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

न्यायालयाची निरीक्षणे --  प्रकल्पाचा खर्च वसूल झालाच, शिवाय टोलमधून भरीव नफाही कंपनीला मिळाला आहे.-  कंपनीशी केलेल्या करारांतर्गत तरतुदी आक्षेपार्ह, असे असेल तर १०० वर्षे टोल सुरूच राहील.-  यास जबाबदार अधिकाऱ्यांची लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश.

- दिल्ली-नोएडा फ्लाय वे- उत्तर प्रदेश व दिल्ली सरकारने मिळून खासगी व्यावसायिकाकडून बीओटी तत्त्वावर फ्लाय वे तयार करून घेतला. - १९९७ मध्ये हे काम सुरू झाले आणि २००१ पासून यावर टोल वसुली सुरू झाली होती. यातील करारानुसार संबंधित व्यावसायिकाला ३० वर्षे टोल वसुलीची परवानगी होती. शिवाय, अपेक्षित टोल मिळाला नाही तर मुदतवाढीची तरतूदही करारात होती. - याविरुद्ध २०१६ मध्ये फेडरेशन ऑफ नोएडा रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने या प्रकल्पाचा खर्च आधीच वसूल झाल्याचा दावा करीत अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही याचिका उच्च न्यायालयाने मंजूर करीत टोल वसुली थांबवली होती.

जनतेची खऱ्या अर्थाने सेवा व्हावीयाप्रकरणी निकाल देताना न्या. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांनी सरकारी कार्यपद्धती किंवा धोरणांतून जनतेची खऱ्या अर्थाने सेवा झाली पाहिजे. ती केवळ खासगी संस्थांना समृद्ध करण्यासाठी नको, असे बजावले. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला सार्वजनिक मालमत्तेतून मोठा नफा कमाविण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयtollplazaटोलनाका