तोगडियांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:59 IST2018-06-25T02:59:10+5:302018-06-25T02:59:13+5:30

विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडलेले व वादग्रस्त वक्तव्यांनी आग्यामोहोळ उठविणारे नेते प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची रविवारी स्थापना केली.

Togadia's International Hindu Council | तोगडियांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

तोगडियांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडलेले व वादग्रस्त वक्तव्यांनी आग्यामोहोळ उठविणारे नेते प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची रविवारी स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही नेत्यांवर असलेला राग तोगडिया यांनी कधीही लपवून ठेवला नव्हता. आपला सातत्याने अपमान केला जातो, अशी त्यांची भावना झाली होती.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहेत. या कार्यक्रमात प्रवीण तोगडिया यांनी परिधान केलेल्या टोपीवर ‘हिंदू ही आगे' असे लिहिलेले होते. या वेळी व्यासपीठावर भारतमाता, गोमाता व गणपती, तसेच अशोक सिंघल यांच्या तसबिरी ठेवलेल्या होत्या. त्यातून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची भविष्यातील वाटचाल कोणत्या मार्गाने होणार हे उपस्थितांना स्पष्टपणे जाणवत होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणाले की, नव्या लोकांना घेऊन मी माझे काम सुरु केले आहे.

Web Title: Togadia's International Hindu Council