शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्य समितीची आज बैठक, पक्ष अध्यक्षांच्या निवडणुकीवर होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

उच्चपदस्थ सूत्रांनुसार २२ जानेवारीच्या या बैठकीत हाही निर्णय घेतला जाईल की, नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसह महाधिवेशनादरम्यानच कार्य समितीच्या सदस्यांची निवडणूक घ्यावी की नाही.  

शीलेश शर्मा नवी दिल्ली :काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत पक्षाचे महाधिवेशन आणि नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार २२ जानेवारीच्या या बैठकीत हाही निर्णय घेतला जाईल की, नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसह महाधिवेशनादरम्यानच कार्य समितीच्या सदस्यांची निवडणूक घ्यावी की नाही.  ग्रुप २३ सतत नेतृत्वावर कार्य समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी दबाब टाकत आहे. कारण सध्या कार्य समितीच्या सदस्यांना अध्यक्षांकडून नियुक्त केले जात आहे. ग्रुप २३चा मात्र या पद्धतीला विरोध आहे. त्याची मागणी अशी आहे की, तिरूपती अधिवेशनाच्या धर्तीवर पारदर्शितेसह निवडणूक घेतली जावी. महाधिवेशन कुठे व्हावे याचाही निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. सूत्रांनुसार रायपूर, जयपूर, चंदीगड किंवा दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यानंतर हे महाधिवेशन घेतले जाईल.

कार्यक्रमपत्रिकेवर काय असतील विषय?संघटनात्मक निवडणुकांशिवाय या व्हर्च्युअल बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांवरही चर्चा होईल. कार्य समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ला सांगितले की, संसदेत उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांबरोबर पक्षाची संसदेत काय रणनीती असावी, विरोधी पक्षांना कसे एकत्र बांधायचे आदी प्रश्नही चर्चेचे विषय होतील. शेतकऱ्यांचे आंदोलन, अर्णब गोस्वामी लीक प्रकरण, तेलाचे वाढते दर, कोरोना लसीकरण आदी विषयही कार्यक्रमपत्रिकेवर असतील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस