महापालिकेची आज महासभा

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:18+5:302015-07-16T15:56:18+5:30

नाशिक : महानगरपालिकेची मासिक महासभा शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजता होत असून, यावेळी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाबरोबरच बहुचर्चित वनौषधी उद्यान प्रकल्पाच्या करारनाम्यासंबंधी चर्चा झडण्याची शक्यता आहे.

Today's General Assembly of Municipal Corporation | महापालिकेची आज महासभा

महापालिकेची आज महासभा

शिक : महानगरपालिकेची मासिक महासभा शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजता होत असून, यावेळी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाबरोबरच बहुचर्चित वनौषधी उद्यान प्रकल्पाच्या करारनाम्यासंबंधी चर्चा झडण्याची शक्यता आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानात वनौषधी उद्यान प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी वनविभागाने सुमारे ९३ हेक्टर जागा वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित केली असून, नाशिक महापालिका व वनविकास महामंडळामार्फत हा संयुक्त प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्यासंबंधी होणार्‍या करारनाम्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. परंतु करारनाम्यात वनविकास महामंडळाने महापालिकेवर काही अटी-शर्ती लादल्याने आणि त्यातून काही आर्थिक भार महापालिकेला उचलावा लागणार असल्याने महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस गटनेते उत्तम कांबळे यांनी या करारनाम्याला यापूर्वीच विरोध केला होता आणि शुक्रवारी होणार्‍या महासभेतही विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना व भाजपाची भूमिका मात्र गुलदस्त्यातच असून, मागील सभेत शिवसेनेने सोयिस्कररीत्या मौन बाळगले होते. त्यामुळे शुक्रवारच्या महासभेत सेना-भाजपाचा नेमका काय पवित्रा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचबरोबर महासभेत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. फाळके व बुद्ध स्मारकातील संवर्धन व सुरक्षासंबंधीचाही विषय चर्चेला येणार आहे.
इन्फो
ध्वजारोहण सोहळ्याचे उमटणार पडसाद
मंगळवारी पुरोहित संघाच्या वतीने गोदाघाटावर झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यात महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांना दुय्यम वागणूक मिळाल्याचे पडसादही महासभेत उमटण्याची शक्यता आहे. महापालिका ही पालकसंस्था असताना आणि सिंहस्थासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना महापालिकेला दुर्लक्षित केल्याबद्दल आणि सोहळ्याच्या वेळी नगरसेवकांना अवमानित केल्याबद्दल संताप व्यक्त होत असून, त्याबाबत महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Today's General Assembly of Municipal Corporation