उबेर बलात्कारप्रकरणी आज अंतिम युक्तिवाद

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:06+5:302015-02-15T22:36:06+5:30

नवी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणाऱ्या उबेर बलात्कारप्रकरणाचा खटला अनेक अनपेक्षित वळणानंतर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे़ दिल्लीच्या एका न्यायालयासमक्ष सोमवारी या खटल्यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होईल़ गतवर्षी ५ डिसेंबरला ही घटना उजेडात आल्यानंतर पीडितेचे बयान नोंदवल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजासमक्ष १५ जानेवारीला खटल्याची सुनावणी सुरू झाली होती़

Today's Final Counsel for Uber Rape | उबेर बलात्कारप्रकरणी आज अंतिम युक्तिवाद

उबेर बलात्कारप्रकरणी आज अंतिम युक्तिवाद

ी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणाऱ्या उबेर बलात्कारप्रकरणाचा खटला अनेक अनपेक्षित वळणानंतर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे़ दिल्लीच्या एका न्यायालयासमक्ष सोमवारी या खटल्यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होईल़ गतवर्षी ५ डिसेंबरला ही घटना उजेडात आल्यानंतर पीडितेचे बयान नोंदवल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजासमक्ष १५ जानेवारीला खटल्याची सुनावणी सुरू झाली होती़
पीडित महिला गुडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. ५ डिसेंबरला तिने मोबाईल ॲपवरून उबेर कंपनीची कॅब बुक केली होती़ आरोपी कॅब घेऊन आल्यानंतर त्याच्या कॅबमध्ये बसून आपल्या इंद्रलोक येथील घरी परत जाण्यासाठी ती निघाली होती़ प्रवासादरम्यान तिचा डोळा लागला आणि शिवकुमार याने एका निर्जन स्थळी कॅब थांबवत तिच्यावर बलात्कार केला होता़ यानंतर दोन दिवसांनी मथुरा येथून आरोपी शिवकुमारला अटक करण्यात आली होती़

Web Title: Today's Final Counsel for Uber Rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.