मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार
By Admin | Updated: November 9, 2014 02:56 IST2014-11-09T02:56:21+5:302014-11-09T02:56:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मनोहर र्पीकर आणि अब्बास मुख्तार नकवी यांच्यासह 20 जणांना सामील करून आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खांदेपालट करणार आहेत.

मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार
र्पीकर, देसाई, अहिर, नकवींसह 2क् जणांचा समावेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मनोहर र्पीकर आणि अब्बास मुख्तार नकवी यांच्यासह 20 जणांना सामील करून आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खांदेपालट करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांचे खातेबदल आणि काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि तेदेपा यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अनुक्रमे अनिल देसाई आणि वाय. एस. चौधरी यांची नावे पाठविली आहेत. हे दोघेही सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत आणि त्यांना केंद्रात राज्यमंत्री बनविले जाण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांसाठी चहापानाचे आयोजन केले आहे. भाजपा नेते अब्बास मुख्तार नकवी यांना 15 वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेले दलित नेते विजय सांपला, हंसराज अहिर, रमेश बैस, राम गोपाल यादव, जे. पी. नड्डा, अजय तामता, जयंत सिन्हा, जाट नेते वीरेंद्र सिंग, गिरिराज सिंग, कर्नल सोनाराम चौधरी आणि गजेंद्र सिंग शेखावत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. नियोजन आयोगाच्या जागी येणा:या नव्या संस्थेत सुरेश प्रभू यांना घेतले जाण्याची शक्यता आहे.
राठोड यांच्या समावेश?
पंतप्रधानांसोबत ‘मॉर्निग टी’ला कोण हजेरी लावणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नेमबाज राज्यवर्धन राठोड, अजमेरचे जाट नेते सावरमल जाट यांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात स्थान मिळणा:या साध्वी निरंजन ज्योती या एकमेव महिला असतील. निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर या दोन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल. जयंत सिन्हा यांना अर्थ राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. (प्रतिनिधी)