शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

गुरुमीत राम रहीमवरील खटल्याचा आज निकाल ; पंजाब, हरयाणात लष्कर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 06:28 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार असून, त्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या अनुयायांनी गोंधळ करू नये, यासाठी पंजाब व हरयाणा राज्यांनी तसेच चंदिगढमधील काही भागात लष्कर दाखल झाले आहे.

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार असून, त्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या अनुयायांनी गोंधळ करू नये, यासाठी पंजाब व हरयाणा राज्यांनी तसेच चंदिगढमधील काही भागात लष्कर दाखल झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पंजाब व हरयाणा राज्यांतील रेल्वे व बससेवा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.पंजाबकडे जाणा-या सर्व गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत.दोन्ही राज्यांतील सर्व शिक्षणसंस्थांना सुटी जाहीर करण्यात आलीअसून, इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली आहे. सिरसा, चंदिगढ व पंचकुला या भागांना लष्करी छावण्यांचे रूप आले आहे.दोन्ही राज्यांच्या सर्व जिल्हाधिकाºयांना जिल्ह्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यांनी प्रसंगी १४४ कलम लागू करावे, अशाही सूचना आहेत.या दोन्ही राज्यांत सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहेत. तेथे प्रसंगी लष्कराला पाठवण्याची तयारीही केंद्राने ठेवली आहे. मात्र केंद्राकडून पुरेशी कुमक मिळाली नसल्याची तक्रार पंजाब सरकारने केली आहे. चंदिगढमध्ये येणाºया वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. डेरा सच्च सौदाचा मुख्य आश्रम सिरसा येथे असून, तेथे गुरुवारीच १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चंदिगढहून २५0 किलोमीटरवर असलेल्या सिरसामध्ये आतापर्यंत राम रहीम यांचे एक लाखाहून अधिक अनुयायी जमले आहेत. तेथे अभूतपूर्व बंदोबस्त आहे.सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अन्य रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली असून, लोकांना सिरसा व चंदिगढ येथे जाण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. सर्व वाहनांची तसेच प्रवास करणाºयांची झडतीही घेतली जात आहे.राम रहीम यांचे अनुयायी हिंसाचार करतील, अशी भीती असल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत. तसेच ठिकठिकाणी छापेही घालण्यात येत आहेत. पंचकुलातील चौधरी देवीलाल स्टेडियम, सिरसा येथील दलबीर सिंग स्टेडियम यांचे तात्पुरत्या तुरुंगांमध्ये रूपांतर करण्यात आलेआहे.राम रहीमविषयीगुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणाºया पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.शांततेचे आवाहनगुरुमीत राम रहीम यांनी अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसे आवाहन त्यांनी करावे, अशा सूचना त्यांना न्यायालयाने दिल्या होत्या.शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.

टॅग्स :Courtन्यायालय