लाटवडे येथील नृसिंह यात्रेचा आज मुख्य दिवस
By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:18+5:302014-05-12T19:48:18+5:30
खोची : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत नृसिंह यात्रा मंगळवारी (दि. १३) आहे. जन्मकाळ झाल्यानंतर रात्री पालखी मिरवणूक निघणार आहे. बुधवारी नृसिंह भंडारा उत्सव आहे. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री अर्चना सावंत यांचा करमणुकीचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी हजरत पीर मंजनवली देवाचा उरूस आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती न्यायालयीन आदेशामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

लाटवडे येथील नृसिंह यात्रेचा आज मुख्य दिवस
ख ची : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत नृसिंह यात्रा मंगळवारी (दि. १३) आहे. जन्मकाळ झाल्यानंतर रात्री पालखी मिरवणूक निघणार आहे. बुधवारी नृसिंह भंडारा उत्सव आहे. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री अर्चना सावंत यांचा करमणुकीचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी हजरत पीर मंजनवली देवाचा उरूस आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती न्यायालयीन आदेशामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. वार्ताहर