आज दीपक साळुंखे भरणार अर्ज
By Admin | Updated: December 8, 2015 01:52 IST2015-12-08T01:52:21+5:302015-12-08T01:52:21+5:30
सोलापूर: विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक साळुंखे-पाटील हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते काँग्रेस भवनापासून निघणार आहेत.

आज दीपक साळुंखे भरणार अर्ज
स लापूर: विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक साळुंखे-पाटील हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते काँग्रेस भवनापासून निघणार आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सोलापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आ. दीपक साळुंखे-पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साळुंखे-पाटील हे काँग्रेस भवनापासून सकाळी साडेदहा वाजता अर्ज भरण्यासाठी निघणार असल्याचे सांगण्यात आले.