आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल
By Admin | Updated: October 3, 2014 02:03 IST2014-10-03T02:03:34+5:302014-10-03T02:03:34+5:30
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल.
आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल
>रघुनाथ पांडे
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. आज युती तुटली म्हणजे नेहमीसाठी तुटली असे होत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रश्न: महायुती का तुटली ?
गडकरी-महायुतीच्या वाटाघाटीपासून मी फार लांब होतो. पण युती व्हावी म्हणून खूप आग्रही होतो. शिवसेनेने 151 जागांचा आग्रह कायम ठेवला. मुळात ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले आहे. ते पद घ्यायला आमचीही हरकत नाही, पण निवडणुकीआधीच मुख्यमंत्नीपदाचा उमेदवार जाहीर करून 25 वर्षांची प्रथा त्यांनी मोडीत काढली. वाटाघाटीत 135 जागा भाजपाला मिळतील अशी अपेक्षा होती. पण सेना नेते शेवटपर्यंत ऐकतच नव्हते. 13क् ही आमची अखेरची संख्या होती. शिवसेनेने मोठ्या भावाच्या भूमिकेतून चांगले वागावे अशी अपेक्षा होती. नेहमीच त्यांची ताठर भूमिका असायची.
- तुम्ही वाटाघाटीमध्ये का नव्हते ?
राज्य व तेथील भाजपा नेते आणि पक्षाने चर्चेसाठी नेमलेले नेते तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा करायची असेच ठरले होते. मी केंद्रीय समितीमध्ये होतो.
- संवाद नसल्याने युती तुटली का ?
आम्ही संवाद ठेवला, तो वाढवला. पण त्यांनी आम्हाला चांगली वागणूक नाही दिली. बाळासाहेब म्हणाले होते लोकसभा तुम्ही लढा, पण विधानसभेत आमचा शेयर ठेवा. लोकसभेच्या जागा आम्ही सेनेसाठी सोडत होतो, पण विधानसभेच्या जागा नाही वाढल्या. काही जागांवर फेरबदल करण्याची विनंती केली. उपयोग होत नव्हता.
- पुन्हा एकत्न येणार ?
आमच्या मनात शिवसेना किवा उद्धव ठाकरें यांच्या बद्दल कोणतीही कटुता नाही. अनंत गीते यांनी राजीनामा देण्याची घाई करण्याची काहीच गरज नाही. कारणही नाही. भाजपाला राज्यात बहुमत मिळेल. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल.
- सेनेला तुम्ही आता काय मानता ?
आम्ही विरोधक मानत नाही. विरोधी पक्ष मानत नाही. प्रचाराचा आमचा संपूर्ण रोख कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांविरोधात असेल. आम्हाला कटुता वाढवायची नाही . भविष्यात युती होऊ शकली तर आनंदच आहे.
- राज ठाकरेंची मैत्नी आड आली का ?
राजकारण हा खेळ आहे. जो जिता वही सिकन्दर. राजकारणातील संघर्ष केवळ निवडणुकीपुरता असतो. त्यामुळे राजकारणात विरोधक आहोत दुश्मन नाही. राजकारणाचा हिशोब लावून मी मैत्नी करत नाही. राज ठाकरेंशी माझी वैयिक्तक मैत्नी आहे. ते लपविण्याचे कारण नाही. शरद पवार, नारायण राणो यांच्याशी माझी मैत्नी आहे. कशाला लपवू! पण राज यांची लोकसभा निवडणुकी दरम्यान घेतलेली भेट युती करावी म्हणून घेतली नव्हती. मात्न ती नेहमी उकरून काढली जाते, ते अयोग्य आहे.
- भाजपाची राष्ट्रवादीसोबत छुपी युती आहे?
खोटा प्रचार आहे. राजकारणासाठी आम्ही एकत्न येणार नाही, कोणतीच छुपी युती नाही. राजकारणात अश्या खूप चर्चा असतात.
- पण हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे म्हटले जाते. खरे काय?
माङयाही कानावर अशा बिनबुडाच्या चर्चा येतात.
- मुख्यमंत्नीपदात तुम्हाला रस आहे ?
माङो मन आता दिल्लीमध्ये रमले . ते महाराष्ट्रात सध्या तरी यायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्नी पदाची चर्चा असली तरी इथे मी कशाला येऊ ? दिल्लीत महाराष्ट्राचा मी राजदूत आहे, तिथेच मला राहायचे आहे. एक मात्न सांगतो, महाराष्ट्रच्या विकासासाठी मी बांधील आहे. प्रगतीसाठी जे होईल ते सारे करेल. देशात महाराष्ट्र क्र मांक एक चे राज्य व्हावे यासाठी वाटेल ते करेन.
चौकशी करणार
तीन वर्षे जी कामे ज्या फायली रखडल्या त्यावर शेवटच्या तीन महिन्यात सरकारने निकाली काढल्या, तेव्हा धोरण लकवा कुठे गेला. त्या फायलीची चौकशी करणार. निर्णय तपासू नाहीतर फेरनिर्णय घेऊ .