शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख लोकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 04:48 IST

८५ हजार लोकांना तोंडाचा : ७३ हजार लोकांना फुप्फुसाचा कर्करोग

सुमेध वाघमारे नागपूर : भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुप्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात. साधारण १ लाख ६० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळून येतात. यातील १ लाख २५ हजार लोकांचा या आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले, भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकट्या नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ४०-४५ टक्के रुग्ण दिसून येत आहेत. महिलांचे प्रमाणही वाढले आहे.तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारे असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य कारण ठरत आहे. हे व्यंधत्व, पेप्टीक अल्सर यालाही कारणीभूत ठरते. धूम्रपानामुळे रक्तामधील |ऑक्सिजनची मात्रा कमी होते, असे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले.

तंबाखूची अखाद्य पदार्थ म्हणून नोंद व्हावीभारतात खाद्य पदार्थांमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने अखाद्य पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. दारू, तंबाखूच्या उत्पन्नातून शासनाला मिळणारा एका वर्षाच्या करातून नवीन अद्ययावत कर्करोग रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल. - डॉ. कृष्णा कांबळे

टॅग्स :IndiaभारतHealthआरोग्य