शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

'मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी...', वक्फ दुरुस्ती विधेयकाला असदुद्दीन ओवेसींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:04 IST

संयुक्त संसदीय समितीने आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील आपला अहवाल सादर केला.

Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर अहवाल तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) आज(13 फेब्रुवारी) आपला अहवाल लोकसभेत सादर केला. समितीचे प्रमुख जगदंबिका पाल आपला अहपाल सादर करत असताना विरोधकांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. अनेक खासदारांचा या विधयाकाला विरोध आहे. यामध्ये एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचाही समावेश आहे. 

ओवेसींची टीका'हे वक्फ विधेयक मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी आणले जात आहे. हे असंवैधानिक असून, मुस्लिमांना त्यांच्या उपासनेपासून दूर ठेवण्यासाठी सरकार हे विधेयक आणत आहे. या विधेयकावर चर्चेसाठी ज्या लोकांना बोलावण्यात आले, त्यांचा या विधेयकाशी काहीही संबंध नव्हता. मुस्लिमांकडून मशिदी, दफनभूमी आणि दर्गे हिसकावून घेण्यासाठी सरकारने हे विधेयक आणले आहे', अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

खर्गे यांनी निशाणा साधलाराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही या विधेयकावर टीका केली. 'जेपीसीच्या अहवालावर अनेक सदस्यांनी असहमती नोंदवली होती, पण ती काढून टाकण्यात आली. फक्त बहुमतामुळे अहवाल पुढे नेणे, हे लोकशाहीविरोधी आणि निषेधार्ह आहे. हे संसदीय परंपरेच्या विरोधात असून, सरकार लोकशाही विरोधी आवाज दाबत आहे,' अशी टीका त्यांनी केली.

इतर विरोधक काय म्हणाले?तर, वक्फ विधेयकावर मेहबुबा मुफ्ती म्हणतात, "भाजपला फक्त मतांची गरज आहे. आधी कलम 370 च्या नावाखाली हे केले, मग मंदिर-मशीद वाद आणि आता वक्फ विधेयक आणले.' समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद म्हणाले, 'या विधेयकाबाबत विरोधकांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. आमचा या विधेयकाला विरोध आहे, कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही.' 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाcongressकाँग्रेस