शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

विद्यार्थ्यांचा 'ममता बॅनर्जी झिंदाबाद' म्हणण्यास नकार; तृणमूल कार्यकर्त्यांची प्राध्यापकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 6:11 PM

वाद सोडवायला गेलेल्या प्राध्यापकादेखील कार्यकर्त्यांकडून मारहाण

कोलकाता: तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप एका प्राध्यापकानं केला. ममता बॅनर्जी झिंदाबाद, तृणमूल झिंदाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यावरुन हा प्रकार घडला. तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं घोषणा देण्यास सांगितलं. त्यावरुन तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी प्राध्यापकानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तृणमूलच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे प्राध्यापकाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी प्राध्यापकानं उत्तरपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 'तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य असलेले कायम बेशिस्तीनं वागतात. मात्र मी त्यांची नावं सांगू शकत नाही. अन्यथा मला महाविद्यालयाच्या परिसरात पाय ठेवता येणार नाही,' अशी भीती मारहाणीत जखमी झालेल्या नाबाग्राम हिरालाल पॉल महाविद्यालयाचे प्राध्यापक सुब्रता चट्टोपाध्याय यांनी व्यक्त केली. 'तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला विद्यार्थ्यांशी गैरवतन करत होते. त्यावेळी मा आणि माझ्यासोबत असलेल्या इतर प्राध्यापकांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. इतर विद्यार्थ्यांनी माफी मागावी अशी मागणी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्यांनी त्यांना ममता बॅनर्जी झिंदाबाद आणि तृणमूल झिंदाबाद घोषणा देण्यास सांगितलं. मात्र विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मलादेखील मारलं,' अशी आपबिती त्यांनी सांगितली.  

टॅग्स :tmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी