शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:07 IST

TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे.

TMC Attack On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) च्या पराभवाचा परिणाम इंडिया आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ममत बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने तर थेट राहुल गांधींच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राहुल गांधींना कमकुवत नेता म्हटले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'हरियाणा किंवा महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही. भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसने सर्व प्रयोग केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आता त्यांना एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे.' 

टीएमसी इंडिया आघाडीच्या बैठकीतून दूर दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत टीएमसी खासदार सहभागी झाले नव्हते. विशेष म्हणजे, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा प्रमुख बनवण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस अन् तृणमूलमध्ये तुतू मैमै सुरू झाली आहे. काँग्रेसने आपला अहंकार दूर करावा आणि ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका