शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 16:21 IST

तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात संसदेच्या आचार समितीची गुरुवारी पहिली बैठक झाली.

नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता समितीसमोर हजर राहायचे आहे. 

या प्रकरणात भाजपचे खासदार आणि तक्रारकर्ते निशिकांत दुबे यांनीही आचार समितीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी भविष्यातही पूर्ण सहकार्य करण्याबाबत सांगितले. यादरम्यान, निशिकांत दुबे यांना त्यांच्या पदवीबाबतही प्रश्न विचारण्यात आले, यावरही त्यांनी उत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिकांत दुबे यांनी सांगितले की, कोर्टात हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. तसेच, आता काही लोक रस्त्यावर उभे राहून आरोप करत आहेत, असे निशाकांत दुबे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात संसदेच्या आचार समितीची गुरुवारी पहिली बैठक झाली. त्यात भाजपचे खासदार आणि तक्रारकर्ते निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत डेहडराई यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीत अनंत देहादराई यांनी शेअर केलेल्या कागदपत्रांचा संदर्भ दिला आहे. हे प्रकरण ओम बिर्ला यांनी भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीकडे पाठवले आहे.

काय आहे प्रकरण?निशिकांत दुबे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राParliamentसंसद