शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:37 IST

Abhishek Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत TMC वारंवार जिंकून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली आहे, म्हणूनच केंद्र सरकारने येथील जनतेला उपाशी मारण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राज्याची थकबाकी रोखून धरली आहे असं बॅनर्जी म्हणाले.

पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनुसार, पूर्व बर्धमान जिल्ह्यातील रैना येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "जर मी खोटं बोलत असेन तर भाजपाने पुराव्यासह त्याचं खंडन करावं आणि मला जेलमध्ये टाकावं. केंद्राने राज्याच्या प्रकल्पांसाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी अद्याप जारी केलेली नाही. बंगालच्या जनतेने सलग विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता दिल्याने येथील गरीब जनतेला उपाशी मारण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललं आहे."

"ममता बॅनर्जींनी आव्हानाचा खंबीरपणे केला सामना"

पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार यांनी "केंद्राने कितीही अडचणी निर्माण केल्या असल्या, तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सर्व आव्हानाचा खंबीरपणे सामना केला आहे. ग्रामीण रोजगारासाठी 'कर्मश्री', घरांसाठी 'बंग्लार बारी' आणि पाणीपुरवठा योजनांसारखे प्रकल्प राज्याने स्वतःच्या संसाधनांतून राबवले आहेत" असं म्हटलं आहे. 

"बंगाल विरोधी पक्षाला चोख प्रत्युत्तर द्या"

"TMC ला नेहमीच तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे, तर मोदींना तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायचे आहेत; कारण तुम्ही वारंवार निवडणुकांमध्ये भाजपाला नाकारले आहे. तुम्हाला उपाशी मारण्याचा कट रचणाऱ्या या 'बंगाल विरोधी' पक्षाला चोख प्रत्युत्तर द्या" असं आवाहनही अभिषेक बॅनर्जी यांनी जनतेला केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi government starving Bengal: Abhishek Banerjee alleges withholding funds.

Web Summary : Abhishek Banerjee accuses the Modi government of withholding funds to starve West Bengal due to TMC's repeated electoral victories. He claims over ₹1 lakh crore is due and challenges BJP to disprove his claims. Banerjee highlights CM Mamata Banerjee's efforts to overcome challenges with state-funded projects.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण