शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शहाजहान शेख यांना आणखी एक धक्का; ममता बॅनर्जींनी ६ वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 17:11 IST

शेख शाहजहान यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) शेख शाहजहान यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी शाहजहानला अटक केल्यानंतर लगेचच पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.

ओब्रायन म्हणाले की, 'आम्ही शेख शाहजहान यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीप्रमाणे, आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही भाजपाला आव्हान देतो की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना निलंबित करावे, असं आव्हान देखील ओब्रायन यांनी दिले. 

गेल्या काही दिवसापूर्वी बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. संदेशखळी येथील अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप शहाजहान यांच्यावर आहे. याशिवाय अनेकांनी जमीन बळकावल्याचाही आरोप आहे. आज शहाजहान शेख यांना अटक करण्यात आली. शहाजहान शेख हे स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी या सीमावर्ती भागात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी संबंधित शहाजहान शेख हे एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख होती.

दरम्यान, काही दिवसापूर्वी त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेशन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकला होता, त्यावेळी समर्थकांनी ईडी आणि सीएपीएफ कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जमीन हडप आणि स्थानिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांविरोधात निदर्शने सुरू आहेत. गेल्या महिन्यात, कथित रेशन घोटाळ्याच्या संदर्भात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या  ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्यानंतर शाहजहान शेख फरार झाले होते.

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल