शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संदेशखली येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येस टीएमसी जबाबदार, मुकुल रॉय यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 10:05 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. भाजपाच्या खासदारांचे दल घटनास्थळाला भेट देणार असून, त्यासंदर्भातील अहवाल गृहमंत्र्यांना दिला जाईल, असे मुकुल रॉय यांनी सांगितले.   यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुकुल रॉय यांनी सांगितले की, ''तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. आमच्या चार कार्यकर्त्यांची संदेशखली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टीएमसीचे नेते आणि मुख्यमंत्री दहशतीचे राज्य फैलावत आहेत. यासंदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा, भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि राज्यातील अन्य नेत्यांना कल्पना दिली आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गातून याचा विरोध करू.''  पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर राज्यात झालेली हिंसाचाराची ही पहिलीच मोठी घटवा आहे. संदेशखली बशिरहाट लोकसभा मतदारसंघामधील भाग असून, बशीरहाटमधून नुसरत जहाँ या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.दरम्यान, पक्षाच झेंडा लावण्याच्या किरकोळ कारणावरून भाजपा आणि तृणमुल काँग्रेस यांच्यात हिंसेला तोंड फुटल्याचे सांगण्यात येत आहे. या हिंसाचारात भाजपाच्या तीन तर तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.  

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिकाPoliticsराजकारण