शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:45 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्दे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 'मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते'

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे' असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

ममता बॅनर्जी यांनी 'मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्यांच्यावरच उलटणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच सात टप्प्यात मतदानाची घोषणा केवळ बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातच करण्यात आली आहे. ही तीन राज्येच केंद्रात कोणाचे सरकार येणार हे निश्चित करणार आहेत असं एका प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला होता. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता.

'भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क केला जात आहे. तुम्हाला किती पैसा हवा, आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला हवा तितका पैसा देतो, आमच्या पक्षात या,' अशा ऑफर दिल्या जात असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात प्रचंड पैसा आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. 'बंगालमध्ये ट्रेननं काहीजण रोख रक्कम घेऊन येत आहेत. मतदारांना वाटण्यासाठी हा सर्व पैसा आणला जात आहे. याबद्दली सर्व माहिती माझ्याकडे आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपा