तिस्ता सेटलवाड यांना दिलासा, अटकेस सुप्रीम कोर्टाची मनाई
By Admin | Updated: February 19, 2015 13:22 IST2015-02-19T13:22:21+5:302015-02-19T13:22:21+5:30
गुजरात दंगलग्रस्तांसाठी गोळा केलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

तिस्ता सेटलवाड यांना दिलासा, अटकेस सुप्रीम कोर्टाची मनाई
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - गुजरात दंगलग्रस्तांसाठी गोळा केलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीला अटक करण्यास मनाई केली आहे.
गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी स्मृतीस्थळ उभारण्यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी निधी संकलन केले होते. यातील सुमारे एक कोटी रुपयांचा तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीने अपहार केल्याचा आरोप आहे. गुजरात हायकोर्टाने तिस्ता सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर सेटलवाड यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सेटलवाड व त्यांच्या पतीच्या अटकेस मनाई करणारे आदेश दिले. सेटलवाड यांची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे का असा सवालही सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला विचारला. सेटलवाड यांनी गुजरात पोलिसांनी देणगीदारांची यादी व संस्थेची माहिती तात्काळ सादर करावे असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. सेटलवाड तपासात सहकार्य करत नसतील तर गुजरात पोलिस त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करु शकतील असेही खंडपीठाने सांगितले.