शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात मिळणार आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये प्रसाद! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 9:23 AM

eco friendly bags : या पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल बॅग डीआरडीओने तयार केल्या आहेत.

ठळक मुद्दे मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे.2019 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात भक्तांना मिळणारा प्रसाद आता बायोडिग्रेडेबल बॅगेत मिळणार आहे. मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे (DRDO) अध्यक्ष जी सतीश रेड्डी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी रविवारी या बायोडिग्रेडेबल बॅग काउंटरचे उद्घाटन केले. दरम्यान, या पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल बॅग डीआरडीओने तयार केल्या आहेत. (tirupati bio degradable laddu bags counter inaugurated at tirumala drdo has prepared these eco friendly bags)

हैद्राबादमध्ये DRDO च्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी DRDOचे संशोधन अद्यापही जारी  आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरण पूरक बॅग तयार केली आहे. ही बॅग 90 दिवसांनंतर आपोआप खराब होते. तसेच, पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी काहीही समस्या उद्भवत नाही, असे DRDOच्या अध्यक्षांनी सांगितले.

बायोडिग्रेडेबलची बॅगची सुरूवातबायोडिग्रेडेबल बॅगची सुरूवात एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. हे प्रोडक्ट मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी म्हटले आहे.

प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी 2019 पर्यंत तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या संख्येने वापर केला जात होता. 2014-2018 दरम्यान येथील लाडूसाठी भाविकांना 9.63 कोटी पॉलिथीनचे वाटप करण्यात आले होते. तत्कालीन अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटDRDOडीआरडीओPlastic banप्लॅस्टिक बंदी