शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबचलांब रांगा, एकाच दिवसांत जमले एवढे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 19:23 IST

तिरुपती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला होती. मात्र, आता सरकारने लॉकडाउनमधून काही प्रमाणात सूट ...

ठळक मुद्दे 8 जूनला तिरुमला तिरुपती देवस्थानने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले केले.तब्बल 83 दिवसांच्या लॉकडाउननतंर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत तब्बल 9 हजार तिकीटे विकली गेली होती.

तिरुपती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला होती. मात्र, आता सरकारने लॉकडाउनमधून काही प्रमाणात सूट द्यायला सुरुवात केली आहे. याला सरकारने अनलॉक-1 असे नाव दिले आहे. यानंतर 8 जूनला तिरुमला तिरुपती देवस्थानने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले केले. मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देवस्थानला हुंडी संग्रहात तब्बल 25.7 लाख रुपये मिळाले आहेत. 

तब्बल 83 दिवसांच्या लॉकडाउननतंर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीचे तीन दिवस केवळ येथील कर्मचारी आणि स्थानिक लोकांसाठीच होते. आता 11 जूनपासून सर्वांसाठी या मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

पहिल्याच दिवशी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा -यापूर्वी तिरुमाला तिरुपती देवस्थान खुले करण्यापूर्वी काउंटर्सवर तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या होत्या. राज्याने सकाळी 8 वाजता राज्यातील सर्वच काउंटर्सवर तिकीट विक्री सुरू केली होती. 11 तारखेची तिकिटे अवघ्या काही वेळातच विकली गेली होते. यानंतर आंध्र प्रदेश सरकारने 12 तारखेची तिकिटे विकण्याचा निर्णयही घेतला होता. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत तब्बल 9 हजार तिकीटे विकली गेली होती.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

दर्शनापूर्वी करावे लागेल या नियमांचे पालन -सांगण्यात येते, की सर्व भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच रांगेत उभे राहण्यापूर्वी सॅनिटाइझ होणेही बंधनकारक असेल. देवस्थानने मंदिर परिसराचे स्पर्श-मुक्त परिसरात रुपांतर केले आहे. भाविक रांगेत आल्यानंतर, कोणत्याही गोष्टींसाठी त्यांना कुठेही स्पर्श करावा लागणार नाही. तसेच भक्तांना रांगेत 5 ते 6 फुटांचे अंतर ठेवावे लागेल. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एककोरोना व्हायरस महामारीमुळे तिरुपती मंदिर 20 मार्चपासून बंद होते. तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे दर महिन्याला जवळपास 200 कोटी रुपये मंदिराला मिळतात. मात्र, लॉकडाउननंतर हे बंद झाले होते.

कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या