मांढळ....
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:48+5:302015-01-23T01:03:48+5:30
चिपडी-मांढळ मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी

मांढळ....
च पडी-मांढळ मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी मांढळ : नागपूर-आंभोरा या मार्गाचे चिपडी गावापर्यंत रुंदीकरण करण्यात आले. मात्र, संबंधित विभागाने चिपडीपासून पुढे मांढळ व आंभोरा मार्गाचे अद्यापही रुंदीकरण केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मांढळ, वेलतूर, आंभोरा व परिसरातील गावातील हजारो नागरिक नागपूर येथे दररोज ये-जा करतात. आंभोरा तीर्थक्षेत्र असल्याने मार्गावर वर्दळीचे प्रमाण अधिकच असते. या रस्त्याने शेकडो वाहने धावतात. चिपडी या गावापुढील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम थेट आंभोरापर्यंत केले जाणार होते. परंतु, अर्धवट असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रुंदीकरण्याच्या कामास संबंधित विभागाने गती द्यावी, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे. (प्रतिनिधी)