शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Tipu Sultan: कर्नाटक सरकारचा निर्णय! शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानचा इतिहास काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:40 IST

Tipu Sultan: सरकारच्या निर्णयाचा काँग्रेसकडून जोरदार विरोध होत असून, भाजपवर भगवेकरणाचा आरोप केला आहे.

बंगळुरू: कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर आता शिक्षणाशी संबंधित आणखी एका प्रकरणाने जोर पकडला आहे. राज्यातील शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी दिली आहे. यामध्ये 18व्या शतकातील शासक टिपू सुलतानशी संबंधित धड्यांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप केला आहे.

'टिपू सुलतानबाबत चुकीचा इतिहास दाखवला'याबाबत सांगताना शिक्षण मंत्री बीसी नागेश म्हणाले की, "आतापर्यंत टिपू सुलतानबद्दल अनेक खोटी माहिती आणि खोटा इतिहास सांगण्यात येत होता. पण, टिपू सुलतानचा खरा इतिहास लोकांना समजावा, यासाठीच शिक्षणात नवीन आणि खरा इतिहासाचा समावेश केला जात आहे. यामुळे मुलांना इतिहासाची योग्य माहिती मिळेल.''

इतिहासातील अनेक बाबी बदलल्या जाणारकर्नाटक सरकारने तयार केलेल्या समितीच्या अहवालात टिपू सुलतानवरील "वैभवशाली साहित्य" कमी करण्याची शिफारस केली आहे. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने काही आठवड्यांपूर्वी आपला अहवाल सादर केला आहे. यानंतर राज्य सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. समितीने टिपू सुलतानवरील प्रकरणे कायम ठेवावीत, परंतु त्याचा गौरव करणारा मजकूर कमी करावा, असे सुचवले आहे.

काँग्रेसकडून विरोधकाँग्रेसचे आमदार प्रियांक खड़गे म्हणाले की, "समस्या ही आहे की, ICSE आणि CBSE चा अभ्यासक्रम, विशेषतः इतिहास भाजपच्या नरेटीव्हमध्ये बसत नाही. भाजपवाल्यांनी कधीच ऐतिहासिक संघर्ष किंवा स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला नाही. त्यांना आता इतिहास बदलून, स्वतःचे नाव इतिहासात लिहायचे आहे.'' याशिवाय, काँग्रेस आमदार अजय सिंह यांनीही भाजपवर फूट पाडून राज्य करण्याचा आरोप ठेपला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस