टिप्पर चालकाची लक्झरी बस चालकास मारहाण

By Admin | Updated: May 7, 2014 00:34 IST2014-05-06T22:07:25+5:302014-05-07T00:34:52+5:30

अकोला: टिप्पर व लक्झरी बसमध्ये झालेल्या अपघातामुळे टिप्पर चालक व लक्झरी बस चालकामध्ये वाद झाला. वादात टिप्पर चालकाने लक्झरी बस चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला- आकोट रोडवरील वल्लभनगर फाट्याजवळ घडली. आकोट फैल पोलिसांनी टिप्परचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला.

Tipper driver hits luxury bus driver | टिप्पर चालकाची लक्झरी बस चालकास मारहाण

टिप्पर चालकाची लक्झरी बस चालकास मारहाण

अकोला: टिप्पर व लक्झरी बसमध्ये झालेल्या अपघातामुळे टिप्पर चालक व लक्झरी बस चालकामध्ये वाद झाला. वादात टिप्पर चालकाने लक्झरी बस चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला- आकोट रोडवरील वल्लभनगर फाट्याजवळ घडली. आकोट फैल पोलिसांनी टिप्परचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला.
आकोट फैलातील सोळाशे प्लॉटमध्ये राहणारे शेख जाकीर शेख याकुब यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार ते एमएच ३0 एए ५३९३ क्रमांकाची लक्झरी बस घेऊन वल्लभनगर फाट्यावरून जात होते. दरम्यान, वल्लभनगर फाट्याकडून एमएच २७ एक्स १७९२ क्रमांकाचा टिप्परने लक्झरी बसला धडक दिली. यात लक्झरी बसचे मोठे नुकसान झाले. याचा जाब लक्झरी चालक शेख जाकीर यांनी टिप्पर चालकास विचारला असता, त्याने टिप्पर चालकासह त्याच्या दोन सहकार्‍यांनी शेख जाकीर यास मारहाण करून जखमी केले. शेख जाकीर यांच्या तक्रारीनुसार आकोट फैल पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३२४, ४२७, २७९ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Tipper driver hits luxury bus driver