ँपान 8 : ‘त्या’ मंत्री-आमदारांच्या कर्जाची चौकशी करा
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30
फोंड्यात शिरोडा भाजपा मंडळांची पत्रकार परिषद

ँपान 8 : ‘त्या’ मंत्री-आमदारांच्या कर्जाची चौकशी करा
फ ंड्यात शिरोडा भाजपा मंडळांची पत्रकार परिषदशिरोडा, बोरी, बेतोडा, पंचवाडी पंचायतींचा पाठिंबाफोंडा : मंत्री महादेव नाईक यांच्यावर काही दिवसांपासून होणारे आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत़ सध्या गाजत असलेल्या लुईस बर्जर प्रकरणातून जनता, तसेच सरकारचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा हा डाव आहे. महादेव नाईकांप्रमाणेच अन्य अनेक मंत्री-आमदारांनी सरकार पातळीवरून मिळणार्या कर्जाचा लाभ घेतला असून त्या सर्व मंत्री-आमदारांच्या कर्ज प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिरोडा भाजपा मंडळ आणि शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी, शिरोडा, बोरी आणि बेतोडा पंचायतीच्या पंचायत मंडळाने केली़शुक्रवारी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली़ या वेळी शिरोडा भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक तिरू नाईक, बेतोडा सरपंच पूनम सामंत, बोरी सरपंच संजय गावडे, शिरोडा सरपंच संदेश प्रभूदेसाई व पंचवाडी सरपंच क्रिस्तेव्ह डिकॉस्टा, तसेच सर्व पंचायतींचे पंचसदस्य उपस्थित होते.दीपक नाईक म्हणाले की, काँग्रेसच्या काळात काही मंत्री-आमदारांनी लाखो रुपयांचे कर्ज माफ करून घेतले. मात्र, भाजपा सरकारने ही कर्जमाफी रद्द करून कर्जाची रक्कम वसूल करून ती खाण अवलंबितांना पॅकेजच्या स्वरूपात देण्याची मागणी केली.सरपंच प्रभूदेसाई यांनी महादेव नाईक यांनी आपण काढलेल्या कर्जाबाबत व ते कुठे वापरले याबाबत लोकायुक्त तसेच निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे सांगितले. पूनम सामंत म्हणाल्या की, सध्या शिरोडा मतदारसंघात काही राजकीय व्यक्तींकडून मोठय़ा प्रमाणात देणग्या दिल्या जात आहेत़ सरकारने या राजकीय व्यक्तीकडे एवढा पैसा कुठून आला याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.या वेळी संजय गावडे, क्रिस्तेव्ह डिकॉस्ता यांनी काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफीचा गैरफायदा घेतलेल्यांकडून रक्कम वसूल करून ती खाण अवलंबितांना देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी) फोटो-0708-स्रल्ल-03 फोटोकॅप्शन- पत्रकार परिषदेत बोलताना दीपक तिरू नाईक. सोबत पूनम सामंत, क्रिस्तेव्ह डिकॉस्ता, संदेश प्रभूदेसाई, संजय गावडे व पंचसदस्य. छाया : शेखर नाईक