शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! स्पा सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांचा छापा; मुलींवर तोंड लपवण्याची वेळ आली, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:56 IST

डॅशिंग आयएएस अधिकारी टीना डाबी नेहमी चर्चेत असतात.

tina dabi news : राजस्थानमधील प्रसिद्ध आणि डॅशिंग आयएएस अधिकारी टीना डाबी नेहमीच चर्चेत असतात. बुधवारी बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी एका स्पावर धाड टाकत मोठी कारवाई केली. सदर घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, या स्पामधून पाच तरुण आणि सात तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. चामुंडा सर्किल परिसरात हा स्पा असल्याचे कळते. सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या. जिल्हाधिकाऱ्यांना पाहताच स्पा चालकाने कुलूप लावून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा न उघडल्यास तोडून आतमध्ये शिरू अन्यथा इथेच थांबू असा इशारा दिला, डाबी यांनी दिला. याप्रकरणी सात जणांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

'नवो बाडमेर' या अभियानाच्या माध्यमातून टीना डाबी शहरातील विविध ठिकाणांना भेट देत आहेत. बुधवारी सकाळी चामुंडा सर्किलजवळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होत्या. पण, त्यांना पाहून स्पा चालकाने मुख्य दरवाजा बंद केला. हे पाहताच टीना डाबी यांना संशय आला आणि अधिकाऱ्यांना या स्पावर छापा मारण्यास सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी स्पाचा दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, संबंधित स्पा चालकाने विरोध करत अर्धा तास सर्वांना तिथेच थांबण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, टीना डाबी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने सांगूनही दरवाजा न उघडल्याने जिल्हाधिकारी संतप्त झाल्या. पोलिसांसह अधिकारी स्पामध्ये गेले असताना अनैतिक कृत्य करणाऱ्या दोन तरुण व पाच मुलींना ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पामध्ये अवैध काम करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. स्पा चालकाने दरवाजा न उघडल्याने प्रशासनाला आक्रमक व्हावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी