शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:13 IST

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देआपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेदेशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ

नवी दिल्ली - पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ आहे. असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची भावना सध्या वेगळ्या पातळीवर आहे. देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार आपला पराक्रम दाखवत आहेत. आज संपूर्ण देश आज एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची एकजूट बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका.'' 

 यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली. ''आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाची प्रगती थांबावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.'' असे  मोदी म्हणाले. 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारत