शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:20 IST

Arvind Kejriwal News : दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांना भेटीची वेळ दिली आहे. 

Delhi CM : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार अशी चर्चा सुरू झालेली असताना अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला. दोन दिवसांत राजीनामा देणार, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या उपराज्यपालांकडे अरविंद केजरीवाल यांना राजीनामा सादर करावा लागणार आहे. दरम्यान, यासंदर्भात सूत्रांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

केजरीवाल उपराज्यपालांना कधी भेटणार?

अरविंद केजरीवाल मंगळवारी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी केजरीवालांना भेटीसाठी वेळ दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वत्त दिले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता भेटीसाठी वेळ दिल्याचे पीटीआयने म्हटले आहेत. 

राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीतील बदलले दिल्लीतील राजकारण

३० ऑगस्ट रोजी भाजपाच्या दिल्लीतील आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री तुरुंगात असल्याचा मुद्दा अधोरेखित भाजपा आमदारांनी दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

भाजपा आमदारांनी दिलेले पत्र राष्ट्रपती भवनाने केंद्रीय गृह सचिवांकडे पाठवले होते. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन दिला. बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि दिल्लीतील राजकारण बदलून गेले. 

नव्या मुख्यमंत्र्याबद्दल उत्सुकता

अरविंद केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा करताना मनिष सिसोदिया मुख्यमंत्री होणार नाही, हेही स्पष्ट केले. सध्या आम आदमी पक्षाच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. नव्या मुख्यमंत्र्याबद्दल बैठकांत चर्चा सुरू आहे. काही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण बसणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री